सुट्ट्या ! सुट्ट्या ! सुट्ट्या !!!!शाळेत असताना कधी एकदा पेपर होतील असे व्हायचे मामा कडे जायला मिळायचे.आजीच्या गोष्टी ऐकायला
मिळायच्या . जस जस मोठे होत गेलो तसं तसं सगळे सुटत गेले. इंजिनीरिंग सुरु झाले तसं बंद झाले. ना सुट्ट्या ना आजीच्या गोष्टी.त्या चार वर्षात सुट्ट्या सगळ्या विसरून गेले होते मी.दरवेळी सगळे छान मज्जा करायचे आणि मी परीक्षा द्यायचे . गावाकडच्या चिंचा, कैरया, आंबे अजून आठवले कि तोंडाला पाणी सुटते.सगळे मिळून दिवस दिवस पत्ते खेळायचो.. खूप धमाल करायचो.. दुपारी कॅरेम आणि कुल्फ्या चा बेत असायचा. संध्याकाळी नदीवर बोटिंग आणि भेळेचा बेत असायचा. कधी कधी सकाळीच नदीवर पोहोयला जायचो आणि कधी दुपारी शेतातल्या विहिरी वर...पोहायला...गावाकडे गेले कि आपोआप एक वेगळाच हुरूप यायचा. एक जोश यायचा घरी कधी काम न करणारी मी गावाकडे कडे सगळी काम करायचे. का माहित नाही पण मला तिकडे काम करायला मज्जा येत असावी....मी इतकी काम करायचे कि पेपर वाल्या आजोबान पासून ते भाजी वाल्या मावशी परीयंत सगळे ओळखायचे भेटले कि म्हणायचे आलात का सुट्टी ला ?? आणि आम्ही हो म्हणायचो..
आयुष्य किती सरकन पुढे सरकते आपल्याला काळात पण नाही, आणि इतके पुढे आल्यावर असे वाटते जस काही आत्ताच घडून गेले आहे आहे.. इतके ताज.. खरच काय रम्य असतात बाल पाणीच्या आठवणी.. ते नटणे, मुरडणे सगळे किती बदलय.... आता ... पण जुन ते सोनच असते नाही का?? आठवणी या अत्तराच्या भरलेल्या कुपी सारख्या असतात त्या उघडल्या कि त्याचा सुगंध सगळी कडे दरवळतो... तसंच माझ्या मनात त्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्याचा सुगंध माझ्या मनात सतत दरवळत राहील...
No comments:
Post a Comment