Saturday, 18 June 2011

Last show of "MJ TEJAS" on 94.3FM....

01/06/2011
 1.04AM
It was last time i heard MJ TEJAS on 94.3 FM.... i never know when am going to listen him in future..its not first time i heard some jockey on radio,but the way he was talking and song that he chooses was just awesome..i just go on listening and listening... in night whenever i tuned the radio.. i am listening 94.3FM for English songs.. its not like that am advertising for this FM... its like i feel its made for mine... though i also listen 98.3FM for best Hindi song collection.. but 94.3FM i listen because of him... i like the way he was talking so fluently...am surely gonna miss him....
         Do u believe in coincidences??? u may thinking what happened to me suddenly?? no nothing happened... i want to say that, at that night, am actually feeling sleepy at around 12.38Pm but still i tuned radio don't know why?? what was i thinking at that time??... i listened my favorite song "This never happened me before.." from the movie "Lake House"...it was awesome... night... so i decided to write on blog.. that's it....


wish karo....

25/5/11
4.11PM
             तुम्हाला वाटत असेल विश् करो म्हणजे नक्की काय म्हणायचे असेल मला ??? लहानपणी सगळ्यांच्या काही तरी इच्छा असतात मला हे व्हायचे मला ते व्हायचे ... सगळ्या बाल इच्छा!!! ...कुणाला पोलीस तर कुणाला पायलट तर कुणाला माधुरी दिक्षित .... दरवेळी काही नवीन पहिले कि ते बनायची इच्छा व्हायची....
            इच्छेला काही कारण लागत नाही हेच खर...इच्छा कधीही निर्माण होऊ शकते त्याचे शक्यता खुद्द ती व्यक्ती पण देऊ शकत नाही. मी नेहमी म्हणत आलीये कि एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल ती मिळवण्यासाठी तुमची इच्छा तेवढी प्रबळ असावी लागते. आणि महत्वाचे ती इच्छा तुमच्या आवाक्यातली पाहिजे.नाहीतर उद्या तुम्ही म्हणाल कि माझ्या मैत्रिणीचा  मित्र माझा व्हावा अशी माझी इच्छा आहे... कसे शक्य आहे ते?? बरोबर ना?? त्या उलट तुम्ही अशी इच्छा करू शकता कि जसा तिचा मित्र आहे तसा तुम्हाला हि मिळू द्या मग मिळेल तुम्हाला तसा.....
           कोणतीही गोष्ट अशी सहज घडत नसते त्या मागे अनेक लोकांच्या अनेक इच्छा असतात..आपण भलेही काही न इच्छा मनात ठेऊ पण समोरच्याने ठेवली असेल तर ती पूर्ण होते आणि मग आपण म्हणतो कि न मागताच एखादी इच्छा पूर्ण झाली...आपण किती वेडे असतो  ना.. साध्या साध्या  गोष्टींचा पण विचार करत नाही.. आणि त्याला चमत्काराचे नाव देतो... 
          इच्छा कधी पूर्ण होतात तर कधी नाही तर कधी लादल्या जातात. त्या मागे काही करणे असतात तर काही नाही.. पण असे पाहण्यात आले आहे कि बरयाच दा इच्छा ह्या थोपवल्या जातात.. आणि हे परंपरेने चालू असते.... मी असे म्हणत नाहीये कि ते चुकीचे आहे, काही अर्थी ते पण बरोबरच असते. पण बरयाच दा तर नसते... माझे असे म्हणणे आहे कि, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. तिला तिचे म्हणणे आहे. काही इच्छा आहे. तरी त्या व्यक्तीला इच्छा निवडण्याचे स्वतंत्र दिले गेले पाहिजे.. 
        कारण मनातल्या इच्छा कधी ना कधी तरी बाहेर येतात, या ना त्या कारणाने  त्यापेखा ज्यावेळी जे करण्याची इच्छा असावी ते माणसाने करणे योग्य राहते नाही का??? एखादी लादलेली इच्छा जर तुमच्या आयुष्याचे नुकसान करणार असेल तर त्याला वेळीच आळा घालणे योग्य ठरेल.. आणि जर आयुष्य मार्गी लागणार असेल तर अश्या इच्छा जरूर लादण्यात याव्यात.. उदारणार्थ आपले आई वडील आपण काही चूक करू नये म्हणून ओरडत असतात ते योग्यच असते. भलेही ते आपल्याला चुकीचे वाटत असेल पण शेवटी ते बरोबरच असते.. 
         पण सगळ्यात शेवटी इच्छा तर असते... आणि कायम राहते. लोक आयुष्यात येतात जगतात. आपली ठरवलेली काम करतात आणि जातात पण इच्छा कधी मारत नाही म्हणनच मी म्हणले कि, इच्छा मागा..... 

Friday, 17 June 2011

बचपन कि यादे.....

 सुट्ट्या ! सुट्ट्या ! सुट्ट्या !!!!शाळेत असताना कधी एकदा पेपर होतील  असे व्हायचे मामा कडे जायला मिळायचे.आजीच्या गोष्टी ऐकायला
मिळायच्या . जस जस मोठे होत गेलो तसं तसं सगळे सुटत गेले. इंजिनीरिंग सुरु झाले तसं बंद झाले. ना सुट्ट्या ना आजीच्या गोष्टी.त्या चार वर्षात सुट्ट्या सगळ्या विसरून गेले होते मी.दरवेळी सगळे छान मज्जा करायचे आणि मी परीक्षा द्यायचे . गावाकडच्या चिंचा, कैरया, आंबे अजून आठवले कि तोंडाला पाणी सुटते.सगळे मिळून दिवस दिवस पत्ते खेळायचो.. खूप धमाल करायचो.. दुपारी कॅरेम आणि कुल्फ्या चा बेत असायचा. संध्याकाळी नदीवर बोटिंग आणि भेळेचा बेत असायचा. कधी कधी सकाळीच नदीवर पोहोयला जायचो आणि कधी दुपारी शेतातल्या विहिरी  वर...पोहायला...गावाकडे गेले कि आपोआप एक वेगळाच हुरूप यायचा. एक जोश यायचा घरी कधी काम न करणारी मी गावाकडे कडे सगळी काम करायचे. का माहित नाही पण मला तिकडे काम करायला मज्जा येत असावी....मी इतकी काम करायचे कि पेपर वाल्या आजोबान पासून ते भाजी वाल्या मावशी परीयंत सगळे ओळखायचे भेटले कि म्हणायचे आलात का सुट्टी ला ?? आणि आम्ही हो म्हणायचो.. 
          आयुष्य किती सरकन पुढे सरकते आपल्याला काळात पण नाही, आणि इतके पुढे आल्यावर असे वाटते जस काही आत्ताच घडून गेले आहे आहे.. इतके ताज.. खरच काय रम्य असतात बाल पाणीच्या आठवणी.. ते नटणे, मुरडणे सगळे किती बदलय.... आता ... पण जुन ते सोनच असते नाही का?? आठवणी या अत्तराच्या भरलेल्या कुपी सारख्या असतात त्या उघडल्या कि त्याचा सुगंध सगळी कडे दरवळतो... तसंच माझ्या मनात त्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्याचा सुगंध माझ्या मनात सतत दरवळत राहील...